दिनांक 21 May 2019 वेळ 10:29 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » मनोर : लहान मुलांसाठी उन्हाळी शिबीर संपन्न

मनोर : लहान मुलांसाठी उन्हाळी शिबीर संपन्न

IMG_20180516_112229प्रतिनिधी
             मनोर, ता. १७  : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीकच्या बोट गावात आदिवासी संस्कृती आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी गावातील आदिवासी समाजाच्या शिक्षकांतर्फे पाच दिवसीय ‘धरतरीच्या पोरांचा कॅम्प’ नावाचे उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
              १२ ते १६ मे या पाच दिवसामध्ये शिबिरात वारली पेंटिंग,चित्रकला, पोर्ट्रेट पेंटिंग, झाड कलम करणे, मातीकाम, आदिवासी हस्तकला, नेमबाजी, कराटे, लाठी चालविणे, योगा, पाककला, गजरे विणणे, वनौषधींची माहिती, तारपा नाच, तबला नाच, टिपऱ्या नाच आणि रानवनस्पतींचा उपयोग करून पुष्पगुच्छ बनविण्याबाबत मार्गदर्शन आणि आदिवासी रितिरिवाज तसेच देव – देवतांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
              परिसरातील सहा ते चौदा वयोगटातील ७४ शालेय विद्यर्थ्यांनी या शिबिरात भाग घेतला होता. यावेळी कॅम्लिन कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना दहा प्रकारचे शैक्षणिक साहित्य आणि वह्याचे मोफत वाटप करण्यात आले.
              लोप पावत चाललेली आदिवासी संस्कृती व परंपरा टिकवून ठेवणे तसेच येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे जीवन विकास संक्षेचे शिक्षक आणि बोट गावचे सुपुत्र दिनेश पारधी यांनी सांगितले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नकुल तरे, मेघा धापशी, सुवर्णा पारधी,विकास मानकर आणि सागर तरे यांनी परिश्रम घेतले.

comments

About Rajtantra

Scroll To Top