दिनांक 21 October 2018 वेळ 1:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » प्रशिक्षणास दांडी मारणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांवर गुन्हा

प्रशिक्षणास दांडी मारणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांवर गुन्हा

LOGO-4-Onlineपालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय – निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षणादरम्यान अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार हि कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ताठ जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून जे अधिकारी, कर्मचारी व शिक्षक प्रशिक्षणास अद्याप हजर झाले नसतील त्यांनी तात्काळ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कार्यालयात हजर व्हावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top