दिनांक 20 January 2019 वेळ 8:12 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनोरला भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय उद्दघाटन

मनोरला भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय उद्दघाटन

20180517_110553प्रतिनिधी
             मनोर, ता. १७ : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत मस्तान नाका येथे भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन राज्य मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.
            तीन वेळा खासदार आणि एक वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्यासोबत ४० वर्षे काम केले असून जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी मोठा निधी केंद्रातून आणला होता. पालघर जिल्हा आदर्श जिल्हा झाला पाहिजे याकरिता कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर कामाला लागून या लोकसभा पोटनिवडणूकित गावित याना विजयी करावे. असे आवाहन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी याप्रसंगी  केले.
          यादरम्यान पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुका उपाध्यक्ष अजय पवार, विद्यार्थी आघाडीचे रामदास हरवटे आणि इतर 25 कार्यकर्त्यांनी भाजप मधे प्रवेश केला. यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार पराग आळवणी, डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी कठोले, जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे, भाऊराव देशमुख, हरिश्चंद्र भोये, मेराज खान आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top