दिनांक 22 March 2019 वेळ 1:12 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » आदिवासी पाड्यांत बोहाडा उत्सव साजरा

आदिवासी पाड्यांत बोहाडा उत्सव साजरा

IMG-20180516-WA0174प्रतिनिधी
जव्हार. दि. १६ : जव्हार तालुक्यातील तिलोंडा जांभुळपाडा या आदिवासी पाड्यांत नुकताच बोहाडा उत्सव पार पडला. पूर्वी पासूनची परंपरा व संस्कृतीचे प्रतिक मानला जाणारा उत्सव म्हणून बोहाडा ओळखला जातो. मुखवट्यंचे नृत्य नाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणून प्रचलित असलेला बोहाडा हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तिन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची रात्री सुरुवात होते. निसर्गासी सबंधित अनेक देव देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून आदिवासींचे पारंपारीक वाद्य असलेले संबळ व पिपाण्याच्या तालावर काठीला कपडा बांधून तयार केलेली मसाल पेटऊन त्या उजेडात मिरवणूक काढली जाते. ही सोंगे  सकाळ होईपर्यत नाचवली जातात. हा उत्सव बघण्यासाठी पर गावात दिलेल्या स्रीया ह्या माहेरवासी येतात तसेच गावातील नोकरी निमित्त शहरात गेलेली माणसे गावी येतात. यंदा या उत्सवात पंचक्रोसीतील भाविक व नागरीकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी  मनोरंजनासाठी पाळणे व लहानग्यांसाठी खेळण्यांचीही विविध दूकाने मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आली होती. या उत्सवाला कोणतेही गाल बोट लागु नये व अनुचीत प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांनी  योग्य नियोजन केले होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top