दिनांक 25 March 2019 वेळ 5:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पोटनिवडणुकीत भाजपाला गाडा – आदित्य  ठाकरेचे शिवसैनिकांना आवाहन 

पोटनिवडणुकीत भाजपाला गाडा – आदित्य  ठाकरेचे शिवसैनिकांना आवाहन 

IMG_20180516_113124प्रतिनिधी  
            वाडा, दि. १६ : भाजपा  सरकारने जनतेला  फक्त टोप्या  घालण्याचे काम केलं असल्याचे सांगत  काही  लाख  गॅस वाटप
केल्याची जाहिरात  करणाऱ्या सरकारतर्फे तुमच्या पैकी कुणाला गॅस मिळाला आहे का? असा सवाल उपस्थित करून  जाहिरात बाजी करणाऱ्या व चिंतामण वनगा यांच्या  कुटुंबीयांची  फसवणूक  करणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत गाडा असे आवाहन शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 
             वाडा तालुक्यातील कंचाड येथे शिवसेनेचे  उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या  प्रचार कार्यालयाचे उदघाटन  आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले
त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की शिवसेना वचन पाळणारा पक्ष आहे.  निवडणुकीत जी वचने देण्यात येतात ती पाळलीच जातात मात्र भाजपाने  गेल्या  निवडणुकीत  दिलेली वचने पाळली का? असा प्रश्न विचारून यांच्या भुलथापांना बळी न पडता शिवसेनेने आपले कर्तव्य चोख बजावून भाजपाच्या मस्तवाल नेत्यांना धडा शिकविण्याचे  केले व शिवसेना हा कार्यकर्त्यांना प्रेम देणारा पक्ष असून असे प्रेम  दुस-या पक्षात दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. पालघर लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे हे वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा या भागात आले असता प्रचार कार्यालयांचे उद्घाटन व प्रचाररॅली मध्ये सहभागी झाले होते.
               यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ  शिंदे, खासदार अरविंद सावंत, पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र  फाटक, आमदार शांताराम मोरे, ठाणे  जिल्हा प्रमूख  प्रकाश पाटील, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, उपजिल्हा अध्यक्ष सुनील  पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटक ममता चेंबूरकर, जिल्हा संघटक वैष्णवी रहाणे, तालुका प्रमुख उमेश पटारे, आदिसह तालुक्यातील व जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी शेकडो  शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना काळजीचा सल्ला.
निवडणूक काळात सूर्य आग ओकत असल्याने  डोक्यावर टोपी वैगेरे घालून, वेळेवर जेवण – पाणी घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा कळकळीचा सल्ला आदित्य ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना दिला.

comments

About Rajtantra

Scroll To Top