दिनांक 21 July 2019 वेळ 5:24 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » कर्नाटकचा विजय भाजपसाठी प्रेरणादायी- राजेंद्र गावित

कर्नाटकचा विजय भाजपसाठी प्रेरणादायी- राजेंद्र गावित

IMG-20180515-WA0001राजतंत्र न्यु नेटवर्क
              पालघर, दि. १६ : ‘कर्नाटकचा विजय भाजपसाठी प्रेरणादायी असून, या विजयाचं प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालातही दिसेल’, असा विश्वास पालघर भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला आहे. सोबतच, ‘ज्याप्रमाणे कर्नाटकमध्ये कांग्रेसच्या जातीय राजकारणाला तिथल्या नागरिकांनी पूर्णपणे नाकारून भाजपच्या विकासात्मक राजकारणाला कौल दिला तसाच ट्रेंड पालघरच्या पोटनिवडणूकीतही दिसेल,’ असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. 
फक्त कर्नाटकच नव्हे तर गेल्या चार वर्षात भाजपने एकहाती विविध राज्यांत विजय पालघरच्या मिळवला आहे याची पुनरावृत्ती पालघरच्या निवडणुकीत नक्कीच दिसेल,’ असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या भूमिकेबद्दल विचारले असता, ‘शिवसेनेने भाजपशी विश्वासघात करून वनगांना उमेदवारी दिली,त्यांनी एकप्रकारे पालघरच्या जनतेचाच विश्वासघात केला आहे आहे’,असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘या विजयामुळे भाजपच्या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात झाली असून भविष्यात भाजपला यापेक्षा मोठा विजय मिळेल,’ असा विश्वास भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
मच्छीमार, वाडवळ, आदिवासी, अल्पसंख्यांकांचे प्रश्न सोडवू – राजेंद्र गावित 
सकाळी दहा वाजता डहाणूच्या महालक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन गावितांनी डहाणूच्या दौऱ्याला सुरवात केली.  ‘पालघरची निर्मिती मी राज्यमंत्री असतानाच झाली. त्यावेळी इथे केलेली कामे पाहूनच सर्वानी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मच्छीमार, वाडवळ, आदिवासी, अल्पसंख्यांकांच्या आणि इतर समाजाच्या प्रश्नांची मला जाण असून, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर दिला जाईल’, अशी हमी त्यांनी दिली. डहाणूमध्ये बोर्डि,घोलवड, जांबुगाव, रामपूर या ठिकाणी त्यांनी आज दौरा केला.
राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा भाजपात प्रवेश
पालघर नगरपरिषद राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रल्हाद (बाबा) कदम यांनी आज आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

comments

About Rajtantra

Scroll To Top