दिनांक 21 July 2019 वेळ 5:26 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » भाजपच्या विक्रमगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

भाजपच्या विक्रमगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

IMG-20180515-WA0046राजतंत्र न्यु नेटवर्क 

पालघर दि. १५ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपच्या विक्रमगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सभापती मधुकर खुताडे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘चिंतामण वनगा साहेबांना श्रीनिवास वनगांमुळे स्वर्गातही वेदना सहन कराव्या लागत आहेत. राजेंद्र गावित निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ असून कमळ निशाणीच्या मागे ठामपणे उभे रहावे,’ असे आवाहन मधुकर खुताडेंनी यावेळी केले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुशील औसरकर, तालुका अध्यक्ष संदीप पावडे, प्रमुख प्रतिनिधी पुंडलिक भानुशाली, चिटणीस भूषण भानुशाली, उपाध्यक्ष महेश आळशी आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top