दिनांक 20 January 2019 वेळ 9:32 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जिल्ह्यातील 9 अवैध दारु  अड्ड्यांवर पोलीसांचा छापा

जिल्ह्यातील 9 अवैध दारु  अड्ड्यांवर पोलीसांचा छापा

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क 
               दि. 15 : पालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध दारु अड्ड्यांवर धडक कारवाई सुरु असुन 12 व 13 मे दरम्यान पोलीसांनी केलेल्या कारवाईत एकुण ठिकाणांवर छापा टाकून सुमारे 4 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  जिल्ह्यातील वाडा, विरार, वालीव, वसई, विक्रमगड, कासा, तलासरी, केळवा आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असुन 9 जणांविरोधात महाराष्ट्र प्रोबीव्हीशन अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 3 जणांना अटक करण्यात आली असुन या कारवाईत एकुण 4 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात गुन्ह्यात वापरलेल्या 4 लाख 5 हजार रुपये किंमतीच्या वाहनांचा समावेश आहे.
अंमलीपदार्थ विक्री करणार्‍या तरुणाला अटक
नालासोपारा पुर्वेतील वलईपाडा रोडवरील संतोषभवन नाक्यावर अंमलीपदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलीसांनी अटक केली असुन त्याच्याकडून 328 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर काल, 14 मे रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान पोलीसांनी या संशयित तरुणाला अटक करुन झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात तुळींज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top