दिनांक 27 May 2018 वेळ 3:16 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

LOGO-4-Onlineप्रतिनिधी

              जव्हार, दि. १५ : पतीकडून चारित्र्यावर संशय घेऊन होणार्‍या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वाळवंडा येथे घडली आहे. उज्वला वझरे असे सदर महिलेचे नाव असुन याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

            अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती मागील काही महिन्यांपासुन आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला क्रुर वागणूक देत होता. रविवारी (१३ मे) त्याने पुन्हा या कारणावरुन पत्नीशी वाद घातल्याने संतापलेल्या पत्नीने वास्याला दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपी पतीला १४ मे राजी रात्री अटक करण्यात आली असुन त्याच्या विरोधात जव्हार पोलीस स्टेशनमध्ये पत्नीचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top