दिनांक 20 January 2019 वेळ 8:13 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » गावठी कट्टा बाळगणार्‍या मोखाड्यातील तरुणास अटक

गावठी कट्टा बाळगणार्‍या मोखाड्यातील तरुणास अटक

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
             मोखाडा, दि. १५ : येथील तेलीपाडा भागात राहणार्‍या 26 वर्षीय तरुणाला अवैधरित्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तेलीपाड्यात भाड्याने रुम घेऊन राहणारा हा तरुण गोळ्या, बिस्कीट, पेप्सी, फरसाण अशा खाद्यपदार्थांची विक्री करतो. आगामी लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिता लागु करण्यात आली असुन जिल्ह्यातील पोटनिवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैधरित्या शस्त्रं बाळगणार्‍या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला मोखाड्यातील एक तरुण अवैधरित्या गावठी कट्टा बाळगत असल्याची खबर मिळाली होती. आज या युनिटने सदर तरुणाला अटक केली असुन त्याच्याकडील ११ हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा हस्तगत केला आहे. दरम्यान, त्याच्याविरोधात मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३ सह २५() व महारष्ट्र पोलीस अधिनियम१९५१ चे कलम ३७ (१)(अ)/१२५  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चालु आहे

comments

About Rajtantra

Scroll To Top