दिनांक 23 April 2019 वेळ 6:21 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » रुस्तमजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली पेट्रोलवर धावणारी सायकल 

रुस्तमजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली पेट्रोलवर धावणारी सायकल 

Dप्रतिनिधी    
            डहाणू, दि. १५ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डहाणू येथील रुस्तमजी महाविद्यालय विविध उपक्रम राबवत असते. काही महिन्यांपूर्वीच येथील विद्यार्थ्यांनी १०० फुटी पिझ्झा तयार करुन विक्रम प्रस्तापित केला होता. आता या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेट्रोलवर धावणारी सायकल तयार केली आहे.
             ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणार्‍या शुभम चव्हाण, प्रथमेश दास, अनल पटेल, केतन चौधरी, ओंकार कदम या विद्यार्थ्यांनी अवघ्या १५ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पेट्रोलवर धावणारी ही सायकल बनवली आहे. २२ हजार रुपये खर्च करुन तयार झालेली ही सायकल एका लिटरमध्ये 70 किमी अंतर धावते, असा दावा या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. या सायकलीस छोटी पेट्रोलची टाकी व छोटा पाईप वापरून सायलेन्सर बसवण्यात आले आहे. सायकलची चाचणी घेण्यात आली असता ती प्रती लिटर ६० ते ७०  कि. मी. चालली. शिवाय वजनाने हलकी आणि आकाराने लहान असल्यामुळे हल्लीची पार्किंगची अडचणही भेडसावणार नाही. तसेच हाफ पायडल व सेल्फ किकने ती स्टार्ट होते. या सायकलला लाईट व हॉर्नही बसविण्यात आले आहेत, अशी माहिती या विद्यार्थ्यांनी दिली.
             महाविद्यालयातील प्राध्यापक विनोद शिंदे यांनी राजतंत्रशी बोलताना सांगितले की, आर्थिक दृष्ट्या सगळ्यांना वापरता येईल असा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ही सायकल बनविण्यात आली आहे. प्रति ताशी ४० कि.मी. वेग देणार्‍या या सायकलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यास साधारण हिची किंमत रु. १५००० ते २२०००च्या दरम्यान असू शकते. यापुढे इलेक्ट्रिक सायकल, बग्गी कार, गो-कार्ट यासारख्या उपक्रमांवर काम सुरू असून हेही प्रयोग यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

comments

About Rajtantra

Scroll To Top