दिनांक 20 October 2018 वेळ 12:54 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर लोकसभा पोटनिवडणूक 7 उमेदवार रिंगणात, दोन अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे

पालघर लोकसभा पोटनिवडणूक 7 उमेदवार रिंगणात, दोन अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क

             पालघर, दि.१४ : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोन उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली असून सात उमेदवार आता निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज दिली. 

पालघर लोकसभेसाठी येत्या 28 मे रोजी पोट निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी एकुण 14 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील 9 उमेदवारांचे अर्ज 11 मे रोजी झालेल्या छाननी दरम्यान वैध ठरले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी यातील राजेश रघूनाथ पाटील व वसंत नवशा भसरा या अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे श्रीनिवास चिंतामण वनगा, भाजपाचे राजेंद्र धेंड्या गावित, माकपचे किरण राजा गहला, काँग्रेसचे दामोदर बारकू शिंगडा, बहूजन विकास आघाडीचे बळीराम सूकूर जाधव, मार्क्ससीटलेनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे शंकर भागा बदादे व संदिप रमेश जाधव (अपक्ष) असे सात उमेदवार ही निवडणूक लढविणार आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top