दिनांक 20 January 2019 वेळ 8:35 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वरोर येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

वरोर येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

VITTHAL RAKHUMAI MANDIRवार्ताहर 

            बोईसर, दि. १४ : उत्तर कोकणातील पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या डहाणू तालुक्यातील वरोर गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरास 19 मे रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मंदिराच्या या शताब्दी महोत्सवानिमित्ताने मंदिर विश्वस्थांतर्फे 19 व 20 मे दरम्यान विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
या मंदिराची स्थापना कमलाकर वामन पंडित, रामचंद्र रघुनाथ पंडित व बाबरेकर बंधू यांनी 20 मे 1918 रोजी मुंबई येथून निधी जमवून केली. नंतर ग्रामस्थांनी यथा शक्ती योगदान देत मंदिराची देखभाल केली. या मंदिरात दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला पंचक्रोशीतून दिंड्या येतात. त्यावेळी आपण साक्षात पंढरपूरला असल्याचा भास होत असल्याचे भाविक सांगतात. महाशिवरात्र, हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा असे उत्सवही येथे नियमित साजरे होतात. मंदिराच्या शताब्दी निमित्ताने 19 मे रोजी विविध पूजा, महाप्रसाद, भजन, कीर्तन व प्रवाचनाचे कार्यक्रम होणार आहेत. तर 20 मे रोजी पूजा, होम, पूर्णाहुती व महाप्रसादाचे आयोजन केल्याचे विश्वास्थांनी सांगितले. तरी भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top