दिनांक 20 January 2019 वेळ 9:02 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध दारु अड्डयांवर धडक कारवाई

पालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध दारु अड्डयांवर धडक कारवाई

PALGHAR DARU ADDE KARVAIराजतंत्र न्युज नेटवर्क 

दि. १४ : पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैधरित्या सुरु असलेल्या मद्यविक्री, हातभट्टी दारु अड्ड्यांवर पालघर पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. 12 व 13 मे अशा दोन दिवसात पोलीसांनी कासा, जव्हार, पालघर, तारापूर, तलासरी, सफाळा, केळवा, विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज आदी भागातील 20 दारु अड्ड्यांवर छापा मारत एकुण 20 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर 9 जणांना अटक करण्यात आली असुन एकुण 2 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 60 हजार रुपये किंमतीच्या वाहनांचा देखील समावेश आहे. दरम्यान, 12 मे रोजी नालासोपार्‍यातील टाकीपाडा सोपारागांव येथे अंमली पदार्थांचे सेवन करणार्‍या एका तरुणाला अटक करण्यात आली असुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top