दिनांक 20 January 2019 वेळ 8:25 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार येथील मनोज कामडी उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानीत

जव्हार येथील मनोज कामडी उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानीत

IMG-20180514-WA0037प्रतिनिधी
जव्हार, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरण -२०१६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला, सांस्कृतिक महोत्सव समिती अंतर्गत स्वराष्ट्र, माझा न्यु नेटवर्क चॅनल, ह्म्रराही फाउंडेशन व ठाणे जिल्हा पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सव समिती यांच्या वतीने काळ, रविवारी कल्याणमधील के. सी. गांधी विद्यालय सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण २०१६ नुसार राज्यातील पर्यटनाला चालना देणे, लोक जनजागृती करणे, लोकांमध्ये आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रोजगार, पर्यटनस्थळ, लोककलेचे जतन, लोकसंस्कृती आदींबाबत जन जागृती करून सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना गौरवण्यात आले, यात अनेक वर्षांपासून आदिवासी भागात पर्यावरण, महिला सक्षमीकरण, लोककला जतन आदी माध्यमातून सामाजिक कार्य करण्यास आदिवासी कवी व साहित्यिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हार तालुक्यातील शिरोशी गावच्या मनोज कमा कामडी यांचा पोलीस अधीक्षक जे. एम. जाधव यांच्या हस्ते उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने गौरव करण्यात आला. इंडोनेशिया येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या तिसरे शब्द मराठी साहित्य संमेलनात कांडींनी सहभाग नोंदवला होता.

comments

About Rajtantra

Scroll To Top