दिनांक 20 January 2019 वेळ 9:18 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक

डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक

IMG-20180512-WA0045राजतंत्र न्युज नेटवर्क
डहाणू, दि. १३ : महाराष्ट्र शासनातर्फे नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये दोन वर्षापेक्षा जास्त काळ नक्षलवादाशी सामना करत सेवा पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आंतरिक सुरक्षा पदक दिले जाते. यावर्षी हे पदक मिळालेल्या अधिकाऱ्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यात डहाणू विभागाचे उपविभागीय पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या सचिन सुरेश पांडकर यांचा समावेश आहे, पांडकर यांनी ९ सप्टेंबर २०१२ ते ७ ऑगस्ट २०१५ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून यशस्वीरीत्या आपले कर्तव्य पार पडले होते. त्यांच्याया या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या वतीने राज्याचे पोलीस महासंचालक यांनी ९ मी २०१८ रोजी त्यांना आंतरिक सुरक्षा सेवक पदक बहाल केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top