भाजपचा प्रचारासाठी ‘लिट्टी -चोखा’ मेजवानीचा बेत कार्यकर्ते उत्तर भारतीय मतांसाठी घरो-घरी

0
16

FB_IMG_1526211184403राजतंत्र न्यु नेटवर्क

पालघर/ वसई, १३ मे : भाजपचे दिवणगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभेसाठी २८ मी रोजी २८ मी रोजी पोटनिवडणूक होत होती. जिल्ह्यातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या पहाताहि निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने नवी शक्कल लढवत मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय  मतदारांना आपल्या सोबत घेण्यासाठी लिट्टी – चोख मेजवानीचा बेत आखण्यात येत असून या माध्यमातून मतदारांशी संवाद साधून त्यांची मते आपल्या पारड्यात पडून घेण्याचा प्रयत्न भाजपतर्फे करण्यात येत आहे. उमेदवारांच्या पळवापळवीमुळे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत विजय मिळवीन याचा भाजप सर्व शक्ती पणाला लावत असल्याचे चिन्ह असून उत्तर भारतीय मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी उत्तर प्रदेशचे काही ठराविक मंत्री आणि आमदार पालघरमध्ये तळ ठोकून बसवणार आहेत. यासंदर्भात मलबार हिल, मुंबई विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मंगलप्रभात लोढा आणि मोहित कंभोज यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच नालासोपारा येथे उत्तर भारतीय मोर्चाची विभागवार बैठक झाली. या बैठकीत भाजप मुंबई युवा मोर्चाचे युवा अध्यक्ष मोहित कंबोज, पालघर युपी मोर्चाचे अध्यक्ष जे. पी. सिंग, नालासोपाऱ्याचे युपी मोर्चाचे अध्यक्ष सुभाष साटम, विभाग आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Print Friendly, PDF & Email

comments