दिनांक 22 September 2019 वेळ 5:56 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे महागात पडणार

आता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे महागात पडणार

IMG-20180511-WA0006राजतंत्र न्युज नेटवर्क
           पालघर दि.११ : जिल्ह्यात खुलेआम धूम्रपान करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उभारला जाणार असून प्रतिबंध असताना देखील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लन्घन करणाऱ्यांवर सिगारेट – तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहे. यासाठी पालघर जिल्हा पोलिसांना खास कोटपाप्रत्यक्ष amalb कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून या कायद्याची प्रत्यक्ष अमलबजावणी जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत बोईसर पोलिसांनी आतापर्यंतल ११ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून २ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. .
              धूम्रपानाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा दुषपरिणाम होतो, विद्यार्थी आणि तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले असून अनेकांना तोंडाच्या कर्करोगाला बळी पडावे लागते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी व शाळा – महाविद्यालय परिसरात खुलेआम सिगारेट ओढणाऱ्या शौकीनांवर कारवाई तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध्य विक्रीवर लगाम घालण्यासाठी तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचा एक भाग असलेल्या सिगारेट – तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा – २००३ (कोटपा) च्या अमलबजावणी संदर्भात पालघर जिल्हा पोलीस मुख्यालयात १० व ११ मी अश्या २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे, नोडल ऑफिसर तसेच पोलीस उपनिरीक्षक सुभाष बन यांच्या सहकार्याने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक ३० सेकंदाला तंबाखू संबंधित कर्करोग रुग्णाचा मृत्यू होत असून यापैकी ९० टक्के मृत्यू हे तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होत आहेत.  मात्र इतर कर्करोगांपेक्षा तंबाखूमुळे होणार कर्करोग नियंत्रतीत ठेवता येईल, मात्र त्यासाठी प्रत्येकाने अशा व्यसनापासून दूर राहिले पाहिजे  असे हेल्थ फाऊंडेशन संस्थेचे निमेश सुमती यांनी सांगितले. यावेळी  संस्थेचे महाराष्ट्र व्यवस्थापक देविदास शिंदे यांनी कोटपा कायद्यावर मार्गदशन केले तर तर समनव्यक श्रीकांत जाधव यांनी प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी कार्यशाळेस सहभागी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे संस्थेतर्फे निरसन करण्यात आले.
पालघर मधील एकूण २३ पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
बोईसरमध्ये एकूण ११ जणांवर कारवाई
कोटपा प्रशिक्षणानंतर पालघर जिल्हा पोलिसांनी बोईसर रेल्वे स्थानक परिसर, बाजार परिसरासह सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे तसेच अवैध पद्धतीने शाळा- महाविद्यालय परिसरात सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपऱ्या, दुकाने  अशा एकूण ११ जणांवर कारवाई  केली असून त्यांच्याकडून दोन हजार दोनशे रूपयांचा दंड वसूल केला. बोईसर पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रकाश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर, पो. नाईक सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोटपा-२००३ कायदा म्हणजे काय 
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने ( जाहिरात आणि व्यापार विनिमय, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण प्रतिबंध कायदा ) अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम-४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तर कलम- ७ नुसार कोणत्याही शैक्षणिक संन्स्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. कलम- ६ ब नुसार बालकांना किव्हा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहेत. या कायदयानुसार २०० रुपये चलन पावती दंड किंवा बाल न्याय कायदा २०१५ नुसार १ लाख रुपये आणि ७ वर्षाची शिक्षची तरतूद करण्यात आली आहे. बाल न्याय कायदा कलम ७७ नुसार कारवाई  करणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top