दिनांक 20 October 2018 वेळ 1:09 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » अपघातात जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघातात जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

IMG-20180510-WA0060वार्ताहर
              बोईसर, दि. ११ : उमरोळीहून पालघर स्थानकाच्या दिशेने जात असताना दुचाकीला अपघात होऊन यात गंभीरजखमी झालेल्या ४५ वर्षीय महेंद्र दया पटेल यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उमरोळी स्थानकात डहाणू पनवेल मेमूचे तिकीट मिळत नसल्याने महेंद्र पटेल आपल्या पत्नीसह दुचाकीचे पालघर स्थानक गाठण्यासाठी निघाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरोळी येथे रहावयास असलेल्या महेंद्र पटेल यांना काल गुरुवारी त्यांच्या पत्नीला पनवेलला घेऊन जायचे होते. मात्र उमरोळी स्थानकात उटीएस (अनारक्षित तिकीट प्रणाली) सेवा कार्यरत नसल्याने पहाटे ५.४० च्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अपघात झाला व यात ते गंभीर जखमी झाले. तसेच त्यांचा पत्नी किरकोळ जखमी झाल्या. अपघातानंतर दोघांनाही तात्काळ गुजरात राज्यातील सेलवास येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज एक वाजता पटेल मृत्यू झाला.

comments

About Rajtantra

Scroll To Top