दिनांक 20 January 2019 वेळ 8:30 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवारांकडून अर्ज दाखल

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवारांकडून अर्ज दाखल

IMG-20180510-WA0030राजतंत्र न्यु नेटवर्क
             पालघर, दि. १० : येत्या २८ मी रोजी होणाऱ्या दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यात भाजप, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी (बविआ), भारिप बहुजन महासंघ आदी पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे. दरम्यान भाजप व बविआकडून यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याने तसेच काँग्रेससह इतर पक्षांचे झेंडे एकाच दिवशी एकत्र आल्याने पालघर शहर आज राजकीय वातावरणात रंगले होते.
            भारतीय जनता पक्षाचे दिवणगत खा. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या २८ मी रोजी निवडणूक होत आहे. खा. वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी मंगळवारी (दि.८)  शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर माकपाकडून किरण गहला व वनसा  दुमाडा यांनी काल, बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज (१० मे) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या sh इवतच्या दिवशी १० इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यात काँग्रेसला धक्का देऊन भाजपात सामील झालेल्या राजेंद्र गावित यांचा समावेश असून भाजपतर्फे पास्कल धनारे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री व्हिअसनू सवरा, खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, व मनीषा चौधरी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते, तत्पूर्वी ढोल पथक व डीजेच्या जोशात निघालेल्या भाजपच्या रॅलीत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होत भाजप उमेदवाराला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
                बविआकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत बळीराम जाधव, वसंत भसरा व राजेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत पक्ष प्रमुख आमदार, हितेंद्र ठाकूर, आमदार विलास तरे, वसई विरार महानगर पालिकेचे महापौर रुपेश जाधव, माजी राज्यमंती मनीषा निमकर, पक्षाचे कार्याध्यक्ष राजीव पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तर राजेंद्र गावित यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेसने साधेपणात दामोदर शिंगडा, व मधुकर चोधरी यांची उमेदवारी बी हर्णे पसंत केले. पालघर तालुका काँग्रेस कार्यालयात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते, मात्र शक्ती प्रदर्शन करण्याऐवजी त्यांनी मोजक्या मंडळींना घेत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी आम दार भाई जगताप, आमदार आनंद ठाकूर, विनायक देशमुख, राजेंद्र गवई, विस्वास पाटील, तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, भारिप, बहुजन विकास महासंघाकडून अशोक शिंगडा, मार्क्ससीटलेलीस्ट पार्टी ऑफ इंडियाकडून (रेड फ्लॅग) शंकर बदादे, समता सेनेकडून (अपक्ष) संदीप जाधव तर प्रभाकर उराडे यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या ११ मी रोजी अर्जाची छाननी होणार असून अर्ज मगर घेण्याची अंतिम मुदत १४ मे आहे.
निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारसंघासाठी डॉ. प्रीतम बी. यशवंत आणि गोरख नाथ यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. प्रीतम बी, यशवंत हे धनु , विक्रमगड व पालघर या तीन विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक असणार आहेत. तर गोरख नाथ हे बोईसर, नालासोपारा व वसई या तीन विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक असणार आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top