दिनांक 26 May 2020 वेळ 8:43 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वाड्यातील सनशाईन कंपनीला भीषण आग, कोट्यावधी रुपयांचे नुकसान  

वाड्यातील सनशाईन कंपनीला भीषण आग, कोट्यावधी रुपयांचे नुकसान  

 प्रतिनिधीIMG_20180510_163114
             वाडा, दि. १०:  तालुक्यातील आबिटघर या गावाच्या हद्दीतील असलेल्या सनशाईन या पुष्ठ्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला गुरुवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास वणव्यामुळे भीषण आग लागली. या आगीत कंपनी जळून खाक झाली असून एक ते दीड कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आठ महिन्यापूवीॅही याच कंपनीत आग लागून सुमारे ७० लाखांचे कंपनीचे नुकसान झाले होते.  दरम्यान, नेहमीच नेहमीच घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे वाड्यातील  उद्योजक हवालदिल झाले असून अग्निशमन दलाची मागणी करू लागले आहेत. 
             मिळालेल्या माहितीवरून, आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास सनशाईन कंपनीबाहेर एका शेतात काहीतरी पेटवलेले होते. त्याची ठिणगी कंपनीतील पुष्ठ्यावर पडून आग लागली आणि बघता बघता संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी सापडली. पुष्ठा जळाऊ असल्याने काही काळातच आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच वसई, पालघर व कल्याण अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत दोन तासांत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत पुष्ठ्याचा कच्चा व पक्का माल जळून खाक झाला होता. दोन तासानंतरही आग धुमसतच होती. या आगीत सुमारे एक ते दीड कोटींच्या आसपास नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज  कंपनीचे मालक मनोज पटेल यांनी व्यक्त केला.
             दरम्यान, वाडा तालुक्यात एक हजारावर कारखाने असून देखील येथे अग्निशमन दल नसल्याने अश्या घटकांमधून आग लागल्यास कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. वसई, पालघर,भिवंडी व विरार येथून अग्निशमन दलाचे बंब येईपर्यंत किमान एक ते दीड तास लागतो. तोपर्यंत कंपनी आगीत जळून खाक झालेली असते. त्यामुळे वाडा येथे अग्निशमन दलाची स्थापना करावी अशी मागणी सनशाईन कंपनीचे मालक मनोज पटेल यांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top