दिनांक 23 February 2019 वेळ 8:02 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू – वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने घेतली मुंबई विभागाच्या नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट

डहाणू – वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने घेतली मुंबई विभागाच्या नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट

IMG-20180509-WA0030वार्ताहर
             बोईसर, दि. १० : पश्चिमरेल्वेच्या मुंबई विभागाचे मावळते विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल  जैन ह्यांच्याकडून नूकताच पदभार स्विकारलेले नवे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांची डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन  त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मुंबई विभागात त्यांचे स्वागत करून आपल्या विविध मागण्याचे निवेदन दिली .
             या भेटी दरम्यान संजय मिश्रा ह्यांनी संस्थेची थोडक्यात ओळख करून घेतली. तर संस्थेने मागच्या वर्षभरात केलेली कामे आणि पुढिल उद्दिष्ट ह्याची थोडक्यात माहिती शिष्टमंडळाने दिली. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे  सदस्य आपली रेल्वे संदर्भातील सर्व लोकोपयोगी कामे ही कायद्याच्या कक्षेत राहून सरळ मार्गाने करतील असा विश्वास ह्या बद्दल  संजय मिश्रा ह्यांना संस्थेतर्फे देण्यात आला. तसेच आपली संस्था ही डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या रेल्वे प्रवासी व रेल्वे प्रशासन ह्यातील दुवा म्हणून काम करेल ह्याची हमी देण्यात आली.
            ह्या प्रसंगी संस्थेतर्फे  संजय मिश्रा ह्यांना स्वागत व शुभेच्छा पत्र तसेच संस्थेने आत्तापर्यंत केलेल्या विविध मागण्यांचे एक संक्षिप्त निवेदन देण्यात आले.  संजय मिश्रा ह्यानी हे निवेदन नम्रपणे स्वीकारुन संस्थेचे  आभार मानले तसेच या निवेदनाचा अभ्यास करून योग्य त्या कारवाईसाठी संस्थेची पुनश्च भेट घेऊ असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात संस्थेचे अध्यक्ष विजय शेट्टी,  उपाध्यक्ष महेश पाटील, सचिव दयानंद पाटील, संस्थापक सदस्य सतीश गावंड, सखाराम पाटील, नागदेव पवार व खजिनदार हितेश सावे आदी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top