दिनांक 20 January 2019 वेळ 8:14 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » उच्छेळी कला-क्रीडा महोत्सव २०१८ उत्साहात संपन्न

उच्छेळी कला-क्रीडा महोत्सव २०१८ उत्साहात संपन्न

LOGO-4-Onlineवार्ताहर 
             बोईसर, दि. १० :  माता युवा मंडळ, गावातील सहकारी तरुण वर्ग, जेष्ठ नागरीक व सार्वजनिक मंडळ यांच्या सह्योगने आयोजित करण्यात आलेल्या उच्छेळी कला-क्रिडा महोत्सव गावच्या नवीन उच्छाला माता क्रिडांगनावर मोठ्या उत्साहात पार पढला.
              या महोत्सवाचे हे ६ वे वर्ष असून दरवर्षी उच्छेळी गावातील  सर्व वयोगटातील नागरिकया महोत्सवात हिरीहिरींने भाग घेतात . या महोत्सवात महिलांकरीता रासिखेच, संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच गावातील लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्याकरीता चित्रकला स्पर्धा व संस्कृतीक कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात महिला व पुरुषांसाठी ठेवण्यात आलेले क्रिकेट सामने आकर्षणाचा विषय ठरला. या स्पर्धेसाठी गावातील ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी टेनिस क्रिकेटमध्ये उच्छेळी गावाचे नाव अजरामर करणाऱ्या वरिष्ठ क्रिकेटपटूंचा मंडळाचीच वतीने सन्मान करण्यात आला.
            दरम्यान उच्छेळी माता युवा मंडळ हे फक्त कला क्रिडा महोत्सवसाठी मर्यादित नसून गावातील सामाजिक कार्यात देखील  मंडळाचा मोलाचा  वाटा आहे. गावात स्वछता अभियान राबविणे, सार्वजनिक सण-उत्सवा मधे गावातील जास्तीत जास्त तरुण वर्गाला एकत्रित करुण गावच्या विकासा करीता प्रोत्साहित करणे, जेष्ठ नागरीकांकरिता नेत्रचिकित्सक शिबिर, मानसिक ताण-तणाव  मार्गदर्शन शिबिर आयोजन करणे, गावातील लहान मुलांकरिता शैक्षणिक सहित्यांचे वाटप करणे, असे विविध उपक्रम हे मंडळ राबवित असते.

comments

About Rajtantra

Scroll To Top