दिनांक 23 April 2019 वेळ 6:19 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वाड्यात अग्नीशमन व शववाहीनीचा प्रश्न ऐरणीवर. 

वाड्यात अग्नीशमन व शववाहीनीचा प्रश्न ऐरणीवर. 

IMG-20180507-WA0000 (1)अशोक पाटील
              कुडूस, दि. १० : वाडा तालुका हा अलीकडे औद्योगिक दृष्टीने विकसित होत आहे. येथे रोजच अपघात व आग लागण्याच्या घटनात विक्रमी वाढ झाली आहे. मात्र काळानुरुप गरज असलेले अग्नीशमन व शववाहीनी अश्या अत्यावश्यक सेवांची येथे उणीव भासत आहे. मागणी करूनही शासन पातळीवर अथवा आमदार खासदार लोकप्रतिनिधी या गोष्टीचा विचार करत नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.
              वाडा औद्योगिक विकासाच्या दृष्टीने दिवसेंदिवस वाढत असून येथे स्थानिक व परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात कारखान्यातून काम करीत आहेत. या कारखान्यांमध्ये रोजच छोटेमोठे अपघात घडून कामगार जखमी अथवा मृत होऊन रुग्णालयात मृत्यूशय्येवर असतात. तर कधी भिवंडी वाडा मनोर महामार्गावर अपघात होऊन प्रवाशांना वाडा भिवंडी ठाणे येथे तातडीने उपचारासाठी हलवावे लागते. अशा आपतकालीन प्रसंगी येथे रुग्णवाहिका उपलब्ध नसते तर कधी आगीची घटना घडली तर अग्नीशमन दलाची गाडी उपलब्ध नसते. या मुळे अनेक वेळा जीवित हानी व वित्तहानी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र याची खंत ना खासदार, ना आमदार अथवा लोकप्रतिनिधीना असते.
               वाडा तालुक्यात डीप्लस झोन झाल्या पासून अनेक मोठं मोठ्या कंपन्या ऊभ्या राहील्या व राहत आहेत. आजवर अनेक घटनात आगीच्या भक्षस्थानी सापडून कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. काही घटना कायम लक्षात राहतील अश्या आहेत. त्या पैकी डोंगस्ते येथील जे. आय. के. ही रासायनिक कंपनी रिअॅक्टरचा स्फोट होऊन व वाड्यातील विजय साॅमिल कंपनी शाॅर्टसर्किटमुळे आगीच्या भक्षस्थानी सापडून खाक झाली.  त्याचबरोबर सापरोंडे येथील पराग केमिकल कंपन, कोंढले येथील फायब्रल नाॅन आयनिक्स प्रा. लि.ही रासायनिक कंपनी,  वसुमती प्रिंट हि कंपनी, वसुमती सोलो मेटल कंपनी अश्या अनेक कंपन्यांमध्ये भीषण आग लागून कंपन्या खाक झाल्या तर यात कोट्यवधींचे नुकसान होऊन कित्येक कामगारही जखमी झाले तसेच वाडा आगाराच्या दोन बस पेटल्या. तर अलीकडे खुपरीतील साईओम कंपनी जळून खाक झाली. दरम्यान अश्या घटना घडल्यानंतर अशा अनेक घटना घडल्यानंतर आगीचे बंब भिवंडी, वसईहुन येतात. मात्र त्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च करून घटनास्थळी पोहोचलेल्या या सेवांचा काहीच उपयोग होत नाही.
          हेच वाडा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णांच्या बाबतीत घडतेय. कधी ठाणा भिवंडीत रूग्णाला हलवायचे म्हटले अथवा मृतदेह घरी न्यायचे असेल तर येथे वेळेवर रूग्णवाहीका अथवा शववाहिनी उपलब्ध नसते. अशावेळी महागड्या खाजगी वाहनाने रूग्णाला हलवावे लागते. अशीच घटना बुधवारी वाडा रूग्णालयात घडल्यानंतर श्रीकांत भोईर यांना वाडा ते कुडूस येथे मृत व्यक्तीचे शव पोहोचविण्यासाठी ७०० रूपये मोजावे लागले. अशा वेळी गरीब गरजू नागरीकांनी काय करावे? अशा घटना लक्षात घेवून शासनाने व लोकप्रतिनिधीनी या बाबत तातडीने वाडा तालुक्यासाठी अग्नीशमन यंत्रणा  व शववाहीनी आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी येथील नागरिक व कारखानदारांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top