दिनांक 16 August 2018 वेळ 4:31 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » निवडणूक संदर्भात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

निवडणूक संदर्भात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
             बोईसर, दि. ९ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असुन आपल्या तक्रारी संदर्भात ०२५२५ – २९७२५० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
निवडणूक आयोगाने २६ एप्रिल रोजी पालघर लिक्सभा मतदार संघाच्या पॉट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार २८ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ >< ७ तक्रार निवारण कक्ष (कोळ सेंटर) सुरु करण्यात आलेले आहे. पोटनिवडणुकीच्या संदर्भात कोणास काही तक्रार करावयाची असल्यास त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top