दिनांक 20 October 2018 वेळ 12:54 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » टेम्पो उलटून अपघात, १२ जण जखमी

टेम्पो उलटून अपघात, १२ जण जखमी

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
बोईसर, दि. ९ : येथील शीगाव रस्तावर भरधाव वेगात असलेला टेम्पो उलटून झालेल्या अपघातात टेम्पोतील १२ जण जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, ८ मे रोजी संध्याकाळी ४ च्या सुमारास शेगाव – गारगाव रस्त्यावरून एक ३ चाकी टेम्पो भरधाव वेगात जात असताना चालकाचे गादीवर नियंत्रण सुटले. यावेळी टेम्पो रस्त्यावरून खाली उतरून उलटल्याने या टेम्पोतून प्रवास करणारे १२ जण जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमींवर बोईसर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर टेम्पोच्या चालकाविरोधात बोईसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top