दिनांक 20 October 2018 वेळ 12:54 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
मनोर, दि. ९ : चिल्हार बोईसर रस्त्यावर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. संदीप वामन गवळी असे सदर तरुणाचे नाव आहे. संदीप हा ८ मे रोजी सकाळी ६. ३० च्या सुमारास चिल्हार – बोईसर रस्त्यावरून भरधाव वेगाने बोईसरच्या दिशेने जात असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यावेळी अनियंत्रित झालेली दुचाकी रस्त्यावरून उतरून रस्त्याशेजारी असलेल्या शेताच्या बांधाला धडकली. यात गंभीर दुखापत झाल्याने संदीपचा मृत्यू झाला आहे या अपघाताची मनोर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top