दिनांक 20 January 2019 वेळ 8:20 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर : बोटीला अपघात, १२ खलाश्यांची सुखरूप सुटका

पालघर : बोटीला अपघात, १२ खलाश्यांची सुखरूप सुटका

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
                पालघर, दि. ९ : तालुक्यातील सातपाटी येथील बंदरात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या शिवनेरी बोटीला आज पहाटे अपघात झाला. जोरदार लाटेच्या तडाख्याने उलटलेल्या या बोटीतील १२ खलाशी कामगार समुद्रात फेकले गेले. मात्र कोस्ट गार्ड व स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान, अपघात होऊन ५ तासांचा अवधी लोटूनही अपघातग्रस्तांना कोस्टगार्डची मदत मिळाली नसल्याचे समोर आले आहे.
सातपाटी येथील मच्छिमार विनोद पाटील यांची शिवनेरी हि मच्छिमारी बोट असुन त्यांनी बंटी धनू यांना ती भाडेतत्वावर दिली होती. मागील ८ दिवसांपासून हि बोट मासेमारीसाठी समुद्रात उतरली होती. २७ नॉटिकल समुद्री क्षेत्रात मासे कमी मिळत असल्याने हि बोट काल मंगळवारी २८ नॉटिकल क्ष्रेत्रात मासेमारीसाठी आली, मात्र आज पहाटे आलेल्या जोरदार लाटेने बोट उलटली आणि सर्व १२ खलाशी कामगार समुद्रात अफेकले गेले. या अपघातानंतर हाताला मिळेल त्या वस्तूंचा आसरा घेत सर्व खलाशी मदतीची वाट पहात होते. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कोस्ट गार्डशी संपर्क साधून तातडीने मदतीसाठी प्रयत्न करा असे आवाहन केले, मात्र अपघातग्रस्त ठिकाणचे लोकेशन आणि नॉटिकल मैलांची माहिती विचारण्याव्यतिरिक्त कोस्ट गार्डकडून काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे बोटीचे मालक पाटील यांनी स्थानिकांना सोबत घेत अपघातस्थळ गाठण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत कोस्टगार्डही गटनस्थळी रवाना झाले. अखेर अपघाताच्या ५ ते ६ तासानंतर सर्व खलाश्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top