माकपाकडून किरण गहला व वनसा दुमाडाचं अर्ज दाखल

0
520

किरण राजा गहला

राजतंत्र न्यु नेटवर्क

पालघर, दि. ०९ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय मार्कवाडी पक्षाकडून किरण राजा घाला व वनसा सुर्जी दुमडा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तसेच या निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी ३ जणांनी अर्ज घेतले आहेत. तर सहाव्या दिवसाअखेर एकूण २८ जणांनी अर्ज घेतले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत खा. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या २८ मी रोजी निवडणूक होत असून खा. वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी काल, मंगळवारी शिवसेनेकडून आपला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर आज माकपाकडून किरण गहला व वनसा दुमाडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच आज प्रग्नेंश शहा, निलेश राऊत आणि इशांत प्रधान यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून सहाव्या दिवसाअखेर एकूण २८ जणांनी अर्ज घेतले आहेत. दरम्यान, उद्या (१० मे) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून इच्छुक उमेदवारांना उद्या सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जोल्हाधिकारी कार्यालयात आपला अर्ज दाखल करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments