दिनांक 20 January 2019 वेळ 8:28 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर पोटनिवडणूक – शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांचा उमेदवारी अर्ज दाखल

पालघर पोटनिवडणूक – शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांचा उमेदवारी अर्ज दाखल

IMG-20180508-WA0001वार्ताहर
बोईसर, दि. ०८ :पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झालेले श्रीनिवास चिंतामण वनगा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने हजारो शिवसैनिकांचा सहभाग असलेली रॅली काढून पालघर शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या २८ मे रोजी निवडणूक होत आहे. मात्र भाजपने आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत चिंतामण वनगा यांची पत्नी जयश्री, मुलगा श्रीनिवास आणि प्रफुल्ल यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर पालघरमधील शिवसैनिकांनी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षश्रेष्ठीनकडे केली होती, काळ, सोमवारी मातोश्रीवरून श्रीनिवास वनगांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज श्रीनिवास वनगा यांनी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, खासदार राजन विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे. आमदार प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर संपर्क महिला संघटक ममता चेंबूरकर, दीपा पाटील, भरती गावकर,शांताराम मोरे,रुपेश म्हात्रे,अमित घोडा. विरोधी पक्ष नेते नवि मुंबइ विजय चौगुले. संपर्कप्रमुख व आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला.  तत्पूर्वी सेनेतर्फे सकाळी पालघर शहरातील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून रॅली काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने श्रीनिवास वनगा यांचे समर्थक व शिवसैनिक उपस्थित होते. त्यात सह संपर्क प्रमुख केतन पाटील.जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण,प्रकाश पाटील,नरेश म्हस्के.जिल्हा महिला संपर्क प्रमुख ममता चेंबूरकर, जिल्हा महिका ज्योती मेहेर, वैष्णवी राहणे , उपजील्हाप्रमुख राजेश कुट्टी,सुनील पाटील,राजा जाधव,संतोष शेट्टी, सर्व तालुका प्रमुख,महिला आघाडी जिल्हापरिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच, सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते .

हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या अडीच किलोमीटरच्या रॅलीत पालघर, विक्रमगड, डहाणू, वसई, नालासोपारा, बोईसर या सहाही विधानसभा क्षेत्रातुन हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सामील झाले होते.

 

comments

About Rajtantra

Scroll To Top