दिनांक 16 August 2018 वेळ 4:30 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कुलगुरू करणार प्राचार्यांना मार्गदर्शन

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कुलगुरू करणार प्राचार्यांना मार्गदर्शन

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
दि. ०७ : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने विरार-वसई, मीरा-भाईंदर सह पालघर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य आणि माहिती तंत्रज्ञान स्मंव्य्क यांची ऑनलाईन मूल्यांकन संबंधीची मार्गदर्शन कार्यशाळा सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सोमवार दि. १४ मे २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित केली आहे. मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर सदर कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे हे या कार्यशाळेस उपस्थित राहून व लाईन मूल्यकनासंबंधीच्या अडचणीचे निराकरण करणार आहेत. या कार्यशाळेस वर नमूद सर्व महाविद्यालयातील प्राचार्यानी माहिती तंत्रज्ञान समन्व्यकांसह उपस्थित रहावे असे आवाहन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. जी. डी. तिवारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top