दिनांक 20 January 2019 वेळ 8:23 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत  ऐश्‍वर्य पाठे, मानस पाटील, हर्षदेव वाघमारे यशस्वी 

पालघर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत  ऐश्‍वर्य पाठे, मानस पाटील, हर्षदेव वाघमारे यशस्वी 

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
            पालघर, दि. ०७ : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये येणार्‍या पेपर पॅटर्नची ओळख व्हावी तसेच स्पर्धात्मक जगाची ओळख होऊन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी पूर्वतयारी व्हावी या हेतूने पालघर जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी घेण्यात आलेल्या पालघर जिल्हा प्रज्ञा शोध परीक्षेत इयत्ता दहावीत ऐश्‍वर्य संजय पाठे, इयत्ता नववी मानस सुदाम पाटील आणि इयत्ता आठवी हर्षदेव रघुनाथ वाघमारे यशस्वी ठरले आहेत.
                सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित पालघर जिल्हा प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन २८ जानेवारी रोजी केले होते. या परीक्षेत पालघर जिल्हयातील सर्व तालुक्यातून १४५५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला व १२५४५ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ठ झाले. परीक्षेचा निकाल इयत्तेनुसार जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय गुणवत्ता यादी तसेच विशेष पारितोषिके या स्वरूपात जाहीर झाला आहे. या परीक्षेस बसलेल्या पालघर जिल्हयाच्या सर्व तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांचा निकाल महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर www.sdsmcollege.com जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा प्रज्ञा शोध परीक्षेचे वैशिष्टये विद्यार्थ्यांच्या मुलाखती होते. लेखी प्राथमिक परिक्षेत इयत्ता नववी व दहावीतील प्रथम ३० क्रमांकाचे गुण प्राप्त झालेल्या इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. लेखी व तोंडी परीक्षेचे मिळून व एकत्रित गुणानुक्रमाने आलेल्या पहिल्या १० विद्यार्थ्यांची बक्षिसांसाठी निवड करण्यात आली.
                मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेव्यतिरिक्त इतर बौध्दिक विचारांचे, आत्मविश्‍वास व सर्वांगीण ज्ञानच्या आधारे प्रश्‍न विचारून विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यात आले. मुलाखतीच्या वेळीस विद्यार्थ्यांच्या सकारात्मक गुणांचा, त्यांच्या भविष्यकालीन स्वप्नांचा, आधुनिक काळातील सर्व तंत्रज्ञान आत्मसात करून त्याद्वारे माहिती मिळविण्याची मानसिकता, राष्ट्रीय योगदान देण्याची सकारात्मकता याचा अनुभव मुलाखत घेणार्‍यांना आला.
आर्थिक स्थिती दुर्बल घटक आणि आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ करण्यात आला होता. जिल्हा प्रज्ञा शोध परीक्षेत सुमारे ७०% विद्यार्थ्यांना २० रुपयांचा प्रवेश माफ करून परीक्षा सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर जाहीर केलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयातर्फे जुलै महिन्यात करण्यात येणार आहे असे महाविद्यालयातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
इयत्ता आठवी
अ.क्र.  विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव
१.        हर्षदेव रघुनाथ वाघमारे सुंदरम सेंन्ट्रल स्कूल, पालघर
२.        मानस संतोश ठाकरे शुभम इंटरनॅशनल स्कूल, पोशेरी – वाडा
३.        सत्यम उत्पल घोष केनम हायस्कूल, पालघर
इयत्ता नववी
अ.क्र.  विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव
१.        मानस सुदाम पाटील ट्ंिवकल स्टार हायस्कूल, पालघर
२.        ग्रीषा विशाल मोहिते आनंद आश्रम इंग्लिश हायस्कूल, पालघर
३.        आर्यन  निलेश कुबल सेंट. झेविअर्स हायस्कूल, वसई
३.        प्रणव प्रशांत कोटी वागड पेस ग्लोबल स्कूल, वसई
इयत्ता दहावी
अ.क्र.  विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव
१.        ऐश्‍वर्य संजय पाठे न्यू इंग्लिश स्कूल, वसई
२.        वैभव भिमराव नाईक टिं्‌वकल स्टार इंग्लिश हायस्कूल, पालघर
३.        वर्षा हृदयनारायण कुशवाह डॉन बॉस्को स्कूल, बोईसर

comments

About Rajtantra

Scroll To Top