दिनांक 20 October 2018 वेळ 1:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

डहाणू : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
               डहाणू, दि. ०७ : १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरोधात कसा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासा येथील विठ्ठलनगर येथे राहणारी पीडित मुलगी भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करते. काही महिन्यांपूर्वीच तिची आरोपी तरुणासोबत ओळख झाली. पुढे त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर पीडित अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून मागील ६ महिन्यापासून तिच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबात तरुणीने कासा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी विरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम ३६७ (२), (एन) सह पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ८ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top