दिनांक 20 January 2019 वेळ 8:56 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » शालेय जीवनापासून माझे डहाणूशी साहित्यिक ऋणानुबंध – मधु मंगेश कर्णिक

शालेय जीवनापासून माझे डहाणूशी साहित्यिक ऋणानुबंध – मधु मंगेश कर्णिक

IMG-20180507-WA0146प्रतिनिधी
             डहाणू, दि. ०७ : शालेय जीवनात कविता लिहायला सुरुवात केल्यावर साठ वर्षापुरवी डहाणूतील साहित्य प्रेमी वीरेंद्र अढीया संपादित कुमार मासिकात माझ्या कविता छापून येत असत म्हणूनच माझे डहाणूशी साहित्यिक ऋणानुबंध असल्याचे प्रतिपादन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी  केले  

५ मे रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या, डहाणू शाखेतर्फे आयोजित डहाणू साहित्य जागर या कार्यक्रमातून ते बोलत होते. व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर, केंद्रीय कार्यवाह, शशिकांत तिरोडकर, डहाणू शाखा कार्याध्यक्ष सदानंद संखे, माजी शाखाध्यक्ष शशिकांत काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी कर्णिक यांनी मार्गदर्शन करताना युवा पिढीने मराठी साहित्य चळवळ  पुढे चालू ठेवण्याचे आवाहन केले. केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळूसकर यांनी नवकवींनी कविता लिहिताना वाचन,लेखन, श्रवण याकडे लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले. तर पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांनी आपल्या प्रास्ताविकात डहाणू शाखेच्या वाटचालीचा आढावा घेतला.
या साहित्य जागरात, सागर तरंग’ प्रातिनिधिक काव्यसंग्रह,प्रेमनाथ राऊत यांची आँपरेशन ब्लँक रोड हि कादंबरी, अनुराधा धामोडे व वीणा माच्छी यांचा काव्यसंग्रहाचे प्रकाशन कर्णिक यांच्या हस्ते झाले.  यावेळी पत्रकारीतेत उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार नरेन्द्र पाटील व नितिन बोंबाडे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयिन युवा लेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी साहित्यदालन उपलब्छ करून दिल्याबद्दल डहाणू वन विभागाचे उपवनसंरक्षक एन.एस.लडकत यांना सन्मानपत्र देण्यात आले ते डहाणू वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम शिंदे यांनी कर्णिक यांच्या हस्ते स्विकारले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विनायक बारी ,यज्ञेश सावे, सामाजिक कार्यकर्ते महादेव सावे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. युवा कवी संमेलनात बारा नवोदित कवी,कवयित्रीने आपल्या कविता सादर करून दाद मिळविली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मेघा पाटील व अर्चना राऊत यांनी केले तर आभार मारूती वाघमारे यांनी मानले.

comments

About Rajtantra

Scroll To Top