दिनांक 20 January 2019 वेळ 8:11 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » आचार संहितेचे काटेकोर पालन करा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य द्या! – जिल्हाधिकारी

आचार संहितेचे काटेकोर पालन करा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य द्या! – जिल्हाधिकारी

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
पालघर, दि. ४ : निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच लोकसभा पोटनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी  तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे  यांनी केल्या.

पालघर लोकसभेचे खासदार ऍड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीयेत्या २८ मी रोजी निवडणूक होत असून त्या निमित्ताने काळ गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित केलेल्या बैठकीत निवडणूक यंत्रणेची तयारी आणि आढावा घेण्यात आला. या बैठकीस  पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, अपर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण महाजन  आदींसह सर्व सहा निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी  तसेच सर्व पोलीस उपअधिक्षक व अधिकारी  उपस्थित होते. या पोट निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सांगून श्री. नारनवरे पुढे म्हणाले आवश्यकतेनुसार आचारसंहिता कक्ष, भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करावीत. तसेच आचारसंहितेचा कोणी भंग केल्यास कोणताही मुलाहिजा न ठेवता तात्काळ कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नि: पक्षपणे व पारदर्शकपणे कार्यवाही करावी. निवडणूका निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरणात पार पाडाव्यात यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांनी चांगला समन्वय ठेवून सदैव दक्ष आणि सतर्क रहावे. असेही  श्री. नारनवरे  म्हणाले. निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशी मतदान केंद्रे निश्चित करुन त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. निवडणूक शांततेच्या आणि निर्भयतेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत असल्याचेही श्री. नारनवरे यावेळी म्हणाले.

पोलिस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पोलिस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व यंत्रणांनी कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.

comments

About Rajtantra

Scroll To Top