दिनांक 23 April 2019 वेळ 5:30 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जव्हार : रोहियो कामे मागूनही मिळेनात, साकुर येथील रोहयो मजुरांकडून बेरोजगार भत्याची मागणी.

जव्हार : रोहियो कामे मागूनही मिळेनात, साकुर येथील रोहयो मजुरांकडून बेरोजगार भत्याची मागणी.

IMG-20180504-WA0418प्रतिनिधी
              जव्हार, दि. ०४: साकुर गावातील रोहयो मजुरांनी रोजगाराची मागणी करूनही रोजगार मिळालेला नसल्याने या मजुरांकडून बेरोजगार भत्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मजुरांवर केवळ मंजुरीसाठी स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये. त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत गावात राहूनही कामे मिळावीत, या कामांमधून गाव परिसराचा कायापालट व्हावा या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मागणी करेल त्याला कामे दिली जातात. मागणी करून कामे मिळाली नाहीत तर त्यांना रोजगार भत्ता देण्याची तरतूद या योजनेच्या कायद्यात आहे.
              साकुर गावातील १०५ रोहयो मजुरांनी २८ मार्च रोजी रोजगार हमीची मागणी केली होती. मात्र  मागणी करूनही या मजुरांना रोजगार मिळालेला नसल्याने त्यांनी जव्हार तहसिलदारांकडे बेरोजगार भत्त्याची मागणी केली आहे. साकुर गावातील शेकडो मजूर आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत असून रोजगार वेळेत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
              शासनाची रोजगार हमी योजना ही मजुरांसाठी सर्वात मोठी योजना आहे. मजुरांना रोजगार हमीवर कामे वेळेत मिळत नसतील, तर रोहयो मजुरांनी नमुना क्र.४ भरून दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या आता रोहयो मजुराला रोजगार हमीवर कामे देणे बंधनकारक असते. मात्र जव्हार तहसील रोजगार हमी योजनेच्या ढिसाळ कारभारामुळे रोहयो मजुरांना अद्यपही रोजगार मिळालेला नाही. तर रोजगार हमीची मागणी करूनही रोजगार मिळत नसल्याने रोहयो मजुरांनी बेरोजगार भत्याची मागणी केली आहे.याबाबत रोहियो सहाय्य्क कार्यक्रम अधिकारी राणी धात्रक यांच्याशी संपर्क साधला असता साकुर गावातील रोहियो मजुरांनी बेरोजगार भत्त्याची मागणी केली असून याविषयी मला काही बोलता येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top