दिनांक 20 January 2019 वेळ 8:31 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » भारती विद्यापीठ तर्फे शालेय स्पर्धा परिक्षेत हर्षद कामडी  राज्यात  प्रथम क्रमांक

भारती विद्यापीठ तर्फे शालेय स्पर्धा परिक्षेत हर्षद कामडी  राज्यात  प्रथम क्रमांक

IMG_20180503_161903प्रतिनिधी
            जव्हार, दि. ०३ : भारती विद्यापीठातर्फे दरवर्षीप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक शालेय स्पर्धेत भारती विद्यापीठ प्रार्थमिक आश्रमशाळा जव्हार या शाळेतील कु. हर्षल रमेश कामडी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
             जव्हार सारख्या आदिवासी भागातील  भारती विद्यापिठ प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थी मागील २५ वर्षांपासून क्रीडा व सांस्कृतिक विभागात उल्लेखनिय कामगिरी करत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भारती विद्यापीठ  तर्फे  शालेय स्पर्धा परीक्षा डिसेंबर २०१७ मध्ये घेण्यात  आली होती  . या स्पर्धेत भारती विद्यापीठ प्राथमिक आश्रम शाळा जव्हार येथील  इयत्ता ७ वी चा विद्यार्थी कु .हर्षल रमेश कामडी हा राज्यात प्रथम क्रमांकाने ऊत्तीर्ण झालेला आहे . हर्षल जव्हार तालुक्यातील शीरोशी या गावात रहावयास असून अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत आहे.  भारती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे (पुणे) हि परीक्षा पास झाल्याबाबतचे अभिनंदनपर पत्र शाळेला प्राप्त झाले असून १० मे रोजी विद्यापीठातर्फे हर्षलचा सत्कार केला जाणार आहे. दरम्यान या विद्यार्थ्यास  मार्गदर्शन  करणारे शाळेचे मुख्याध्यापक   डी. बी. जरग सर्व शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी  यांचे संपूर्ण  जव्हार परिसरातून कौतुक होत आहे. हि शाळा सन २०१७/१८ हे वर्ष रौप्य महोत्सवी शाळेला मिळालेली जणू काही सदिच्छा भेटच असल्याची भावना व्यक्त होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top