दिनांक 20 October 2018 वेळ 12:54 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणूत कोमसापच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन

डहाणूत कोमसापच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
दि. ०२ : कोकण मराठी साहित्य परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी, दि. ५ मे २०१८ रोजी दुपारी २ वाजता दुर्वांकुर सभागृह, श्री. गजानन महाराज मंदिरा शेजारी आगर रोड डहाणू (पश्चिम) जि. पालघर येथे परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून या सभेत कोमसापचे विश्वस्त प्रमुख व जेष्ठ साहित्यिक पदमश्री मधू मंगेश कर्णिक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी कोकण, मुंबई व नवी मुंबई जिल्ह्यातील कोमसापच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीत या विशेष सर्व साधारण सभेत परिषदेचे सण २०१८ ते २०११ या तीन वर्षासाठीच्या नवीन कार्यकारी मंडळाची व विविध विभाग प्रमुखांची निवड करण्यात येणार आहे. यावेळी डहाणू शाखेचा विशेष विशेष वाड्मयीन कार्यक्रम व कवी संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी कोमसापच्या सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसापचे केंद्रीय कार्यवाह प्रा. अशोक ठाकूर यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top