दिनांक 16 August 2018 वेळ 4:31 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » भवानगडावर दुर्गदिन साजरा

भवानगडावर दुर्गदिन साजरा

IMG-20180502-WA0002राजतंत्र न्यु नेटवर्क 
           पालघर, दि. २ : पालघर जिल्ह्यातील गडकोटांवर संवर्धन करणारी सह्याद्री मित्र संस्थेच्या वतीने सफाळेनजिक असलेल्या भवानगडावर १ मे रोजी ‘दुर्गदिन’ साजरा करण्यात आला. अलिकडे महाराष्ट्रातील दुर्गसंवर्धन करणाऱ्या विविध संस्था महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गडकोटांवर दुर्गदिन साजरा करु लागल्या आहेत.
            गडावरील महादरवाजा, बालेकिल्ला आणि देवडी या भागातील केरकचरा तसेच हौशी पर्यटकांनी टाकलेला कचरा उपस्थित शिलेदारांनी साफ केला. तसेच रांगोळी आणि फुलांची आरास करुन शिववंदना आणि भवानगडाच्या निर्मितीसाठी झटलेल्या ज्ञात – अज्ञात विरांना मानवंदना देण्यात आली. या
कार्यक्रमावेळी सह्याद्री मित्र संस्थेचे दीपक पाटील यांनी उपस्थितांना भवानगडाचा इतिहास आणि गडाच्या परिसरातील काही गावांच्या ज्ञात – अज्ञात इतिहासाची ओळख करुन देत पालघर जिल्ह्यातील गडकोटांवरील दुर्गसंवर्धन कामाची दशा आणि दिशा स्पष्ट केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top