दिनांक 20 January 2019 वेळ 9:12 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर : नागरिकांच्या गोंधळामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाची जनसुनावणी रद्द

पालघर : नागरिकांच्या गोंधळामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाची जनसुनावणी रद्द

IMG-20180502-WA0023वार्ताहर
           बोईसर, दि. ०२ :  मुबंई अहमदाबाद या प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक आज जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलेल्या जनसुनावणीत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत गोंधळ घातल्याने अखेर हि जनसुनावणी रद्द करण्यात आली.
             पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत राष्ट्रीय हाय स्पीड रेल निगम मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात बुलेट ट्रेन जेथून जाणार आहे तेथील पर्यवरण विषयावर आज सल्ला मसलत करणारी जनसुनावणी ठेवण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ प्रश्नात नारनवरे ,बुलेट ट्रेन प्रकल्प चे मुख्य प्रकल्प अधिकारी यु. पी सिंग, मुख्य व्यवस्थपक पंकज रोके, ऐ. के गुप्ता, उपवनसंरक्षक नानासाहेब लंडकत आदी उपस्थित होते. यावेळी जनसुनावणी सुरू होताच  या प्रकल्पाला अगोदरपासूनच विरोध असलेल्या ग्रामस्थांनी तसेच विविध पक्ष – संघटनांनी या जनसुनावणीवर अनेक प्रश्न उपस्थित करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. ही जनसुनावणी कोणत्या नियमांना धरून आयोजित करण्यात आली? जनसुनावणीकरिता आवश्यक ती व्यवस्था केली होती का? जनसुनावणीसंदर्भात कोणत्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती? आदी प्रश्नांचा भडीमार यावेळी उपस्थितांनी केला. तसेच ही सुनावणी बंद करून बुलेट ट्रेन प्रकल्पच रद्द करा, अशी मागणी करत भूमिसेना, कष्टकरी संघटना, भूमिपुत्र बचाव संघर्ष समिती व मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ही बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला. तर नियोजन भवनमध्ये जनसुनावणीसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना बसण्यासाठी पुरेश्या प्रमाणात जागा नसल्याने काही जणांना खाली बसण्याची वेळ आली. त्यानंतर उपस्थितांकडून यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना देखील खाली बसण्यास भाग पाडण्यात आले. अखेर योग्य ती व्यवस्था न केल्याचे मेनी करत जिल्ह्याधिकाऱ्यांकडून ही बैठक रद्द करण्यात आली.
               एकीकडे ही सुनावणी सुरु असताना साखरे व देहणे या गावांमध्ये अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात बुलेट ट्रेन सर्वेक्षणाचे काम सुरु केल्याची माहिती पसरल्याने आणखीनच संतप्त झालेल्या नागरिकांनी नियोजन भवनात ठिय्या मांडला. तसेच ग्रामस्थांना विश्वस्त न घेता सर्वेक्षणाचे काम सुरु केल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला वर्गाची पोलिसांची झटापटी झाली. दरम्यान हा सर्व गोंधळ पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांना विश्वस्त घेऊनच काम सुरु केले जाईल, असे आश्वसन यु. पी. सिंग यांनी दिले.

comments

About Rajtantra

Scroll To Top