दिनांक 20 January 2019 वेळ 9:32 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » राज ठाकरेंचा सामान्यपणाचा फार्स  भर उन्हात कार्यकर्ते तब्बल तीन तास ताटकळले 

राज ठाकरेंचा सामान्यपणाचा फार्स  भर उन्हात कार्यकर्ते तब्बल तीन तास ताटकळले 

IMG-20180502-WA0067प्रतिनिधी
             वाडा, दि. २ : पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरे यांनी आपली 
असामान्यपणाची प्रतिमा बदलण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यात मिसळण्याचा फार्स केल्याचे चित्र आजच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दिसले. दरम्यान, ठाकरेंच्या भेटीसाठी वाडा येथे दूरदूरहून आलेल्या कार्यकर्त्यांना भर उन्हात वाट पाहत तब्बल तीन तास ताटकळत राहावे लागल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर होता.
               महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी पक्ष प्रमुख राज ठाकरे हे १ मे पासून राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्याची सुरवात त्यांनी पालघर जिल्ह्यातून सुरवात केली असून मंगळवारी   त्यांनी वसई येथे जाहीर सभा घेतली. आज बुधवारी ( दि. २  )  विभागवार  बैठका घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वाड्यात दुपारी दोन वाजता आयोजित केलेल्या बैठकीत ते कार्यकर्त्यांशी  थेट संवाद साधणार होते. परंतु ते तब्बल तीन तास उशीरा आल्याने जव्हार, डहाणू, मोखाडा, विक्रमगड, वाडा या परिसरातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागल्याने कार्यकर्ते चांगलेच हिरमुसले होते. ठाकरे हे  सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचून कार्यकर्त्याच्या भावना व प्रश्न जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
              राज ठाकरे हे सामान्य कार्यकर्त्यांना भेटत नाहीत त्याच्यांशी ते तुसडेपणाने वागतात अशी गेल्या काही वर्षांत त्यांची प्रतिमा बनली होती. या दौऱ्याच्या निमित्ताने ही प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न त्यांच्या कडून होत असल्याचे या दौऱ्यात दिसले. यावेळी त्यांनी दुपारचे भोजन वाडा तालुक्यातील रायसळ   या गावातील एका आदिवासी कार्यकत्याच्या घरी घेत सामान्य कार्यकर्त्याशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी वाडा येथे बैठकीसाठी आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी एका चांगल्या हाॅटेलचा आश्रय घेतल्याने हा सामान्यपणाचा फार्सच केल्याचे दिसून आले. तर सभास्थळी उभारलेल्या व्यासपीठावरही न बसता व्हीआयपी खुचीॅ नाकारून कार्यकत्यामध्ये एका साध्या खुचीॅत बसत आपले नेतृत्व हे सामान्य असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या दौऱ्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार  बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, ठाणे जिल्हाध्यक्ष  अविनाश जाधव,  राजन गावंड आदी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top