दिनांक 20 January 2019 वेळ 8:16 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पालघरसह मुंबईवर कब्जा करण्याचा डाव – राज ठाकरे 

विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पालघरसह मुंबईवर कब्जा करण्याचा डाव – राज ठाकरे 

LOGO-4-Onlineवार्ताहर
              बोईसर, दि. २ : मुंबईला काबीज करायचे असेल तर आगोदर पालघर हातात घेऊन हळूहळू मुंबईवर कब्जा करण्याचा डाव मोदी सरकारचा आहे.  त्यामुळे  प्रथम पालघर जिल्ह्याला गुजरातला जोडतील नंतर मुबई असे विधान आज बोईसर येथे  अनौपचारीक संवाद साधताना केले.  
               संघटनात्मक बांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरेंनी  बुधवारी ( दि. २ )  पालघर जिल्ह्यातील प्रश्न व विविध प्रकल्पांबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जे. एस. डब्लू.  व वाढवण बंदर विरोधी संघर्ष  समिती, वडोदरा एक्सप्रेस विरोधी संघर्ष समिती, सूर्या पाणी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत   ठाकरे यांची आज सकाळी बोईसर येथे बैठक झाली. यावेळी त्यांनी  प्रत्येक समितीसोबत स्वतंत्रपणे  चर्चा करत समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी  बुलेट ट्रेन ही व मुबई वडोदरा दृतगती मार्ग  उभारून पालघर जिल्हा प्रथम गुजरातशी जोडण्याचा  कुटील डाव  असल्याचे ते म्हणाले . मोदी सरकारने जीएसटी ,नोट बंदी हे निर्णय  घेतले. मात्र का घेतले याबद्दलचे उत्तर मोदी सरकार कडे नसल्याचा टीका  करून भाजप विरोधी भूमिका आपण स्वतः घेत आलो आणि घेत राहणार असल्याचे त्यांनी संवाद साधताना सांगितले . मोदी सरकारने  नागरिकांना कसे फसविले आहे या बद्दल  जनजागृती कारण्यासोबतच  लोकांपर्यत जाऊन राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांविषयी  माहिती पोचवून उठाव करण्याची भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे ते  पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
              यानंतर ठाकरे यांनी वाढवण ,नांदगाव येथे प्रस्तावित बंदरांचा दौरा केला. नांदगाव येथील कार्यकर्त्यांनी जिंदाल बंदराविरोधातील आपले निवेदन त्यांना दिले.  त्याचप्रमाणे  प्रत्येक ठिकाणच्या मनसे कार्यकर्त्यांशी चर्चा व भेटी घेऊन पक्ष बांधणी चर्चा केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top