दिनांक 27 May 2018 वेळ 3:19 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनोर : सावत्र पित्याचा १२ वर्षीय मुलीवर बलात्कार

मनोर : सावत्र पित्याचा १२ वर्षीय मुलीवर बलात्कार

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
               मनोर, दि. ३० आपल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत व तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत सावत्र पित्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना मनोर येथे उघडकीस आली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम पिता मागील वर्षभरापासून पीडित मुलीवर अत्याचार करत होता. तसेच याबाबत कुठेही वाकयता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याने घाबरलेल्या पीडितेने या प्रकारावर मोईन बाळगले होते. २५ एप्रिल रोजी पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर पीडितेच्या आईने याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार आरोपी पित्या विरोधात मनोर पोलीस स्टेशन मध्ये बलात्कारासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत

comments

About Rajtantra

Scroll To Top