दिनांक 20 January 2019 वेळ 8:47 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू : घरगुती वादातून मुलाने केली वडिलांची हत्य

डहाणू : घरगुती वादातून मुलाने केली वडिलांची हत्य

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
             डहाणू, दि. ३० : आईला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या वडिलांची संतापलेल्या मुलाने लाकडी दांडक्याने डोक्यात प्रहार करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कासा येथे घडली आहे. या हत्येनंतर मुलाने वडील झाडावरून पडल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचा हा बनाव उघडकीस आल्यानंतर याबात त्याच्याविरोधात हत्येचा गन हा दाखल करण्यात आला आहे.
कासातील रायपूर गावच्या हद्दीतील माढीपादहा येथे राहणाऱ्या विजय जवल्या बेडगा (वय ४८) यांचा 25 एप्रिल रोजी घरासमोरील झाडावरून पडून मृत्यू झाल्याची तक्रार कासा पोलिसस्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद देखील केली होती. मात्र याप्रकरणी अधिक तपास केला असता विजय बेडगा यांची हत्या झाल्याचा पोलिसांना आला. त्यानुसार बेडगा यांच्या मुलाची चौकशी केली असता आपणच वडिलांची हत्या केल्याचे त्याने कबील केले. वडील नेहमी आपल्या आईला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने रंगाच्या भारत लाकडी दांडक्याने डोक्यात प्रहार करून वडिलांचा खून केल्याचे तसेच हत्या लपविण्यासाठी वडील झाडावरून पडल्याचा बनाव रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार कसा पोलिसांनी आरोपी मुलाला २८ एप्रिल रोजी रात्री अटक करून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १८१ नुसार गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top