दिनांक 20 January 2019 वेळ 9:08 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हारमध्ये तथागत गौतम बुद्धांची २५६२ जयंती साजरी.

जव्हारमध्ये तथागत गौतम बुद्धांची २५६२ जयंती साजरी.

IMG-20180430-WA0434प्रतिनिधी
             जव्हार, दि. ३० : विश्ववंदनिय तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६२ वी जयंती शहरात साजरी करण्यात आली.  यावेळी  पहिल्यांदाच नालंदा बुध्दविहार येथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच जयंतीनिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले.
           सकाळी ९ वाजता भगवान बुद्ध यांच्या मूर्तीसह शांतता रॅली काढण्यात आली होती. हि रॅली विजयस्तंभ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पचबत्ती, जव्हार अर्बन बँक, गांधी चौक ते विठ्ठल मंदिरास विळखा घालून नालंदा बुद्ध विहार येथे समर्पित करण्यात आली. यावेळी या रॅलीत जवळपास ३०० ते ४०० धम्म उपासक उपासिका सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता पूज्य भदंत धम्मदीप यांचे हस्ते नालंदा बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या वेळेपासून त्यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते. तसेच दुपारी २ ते २.३० वाजेदरम्यान भोजन व खीर दानाचे आयोजन करण्यात आले होते. तर  दुपारी २.३० ते ४ वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम व आभार प्रदर्शन पार पडले. या कार्यक्रमास तालुक्यातील असंख्य बौद्ध धम्म बांधव उपस्थित होते. आयोजकांनी या सगळ्या विधीसाठी येताना पांढरे वस्त्र परिधान करण्याचे आवाहन केले होते, एक आगळा वेगळा उत्साह या वेळी पहायला मिळाला.

comments

About Rajtantra

Scroll To Top