दिनांक 20 January 2019 वेळ 8:12 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मातृभूमी आदिवासी सेवाभावी संस्था यांची सर्वसाधारण सभा संपन्न 

मातृभूमी आदिवासी सेवाभावी संस्था यांची सर्वसाधारण सभा संपन्न 

IMG_20180430_120835प्रतिनिधी

                जव्हार, दि. ३० : मातृभूमी आदिवासी सेवाभावी संस्था वाडा यांची सर्वसाधारण सभा आज जव्हार येथील आदिवासी भवन येथे पार पडली या सभेत आदिवासीच्या प्रश्नांवर तसेच पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
             अध्यक्ष मधुकर राऊत यांनी भूषविले. प्रथम क्रांतीकारकांच्या प्रतिमेला हार व श्रीफळ वाहून पूजा करून कार्यक्रमाची सुरवात केली .त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय करून देण्यात आला. यावेळी जनार्दन राऊत यांनी बिंदूनामावली या विषयावर सविस्तर माहिती देऊन त्या अंतर्गत केलेल्या कामाविषयी मार्गदर्शन केले. बोगस आदिवासी जात धारण करून खऱ्या आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्याबाबत तसेच सन १९९५ ला बिगर आदिवासींना संरक्षण दिले आणि शासनाच्या अथ्यादेशामध्ये तरतूद असूनही अनुसूचित जमातीच्या रिक्त झालेल्या पदावर मूळ आदिवासींची पदे न भरल्याने या विषयावर सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच पालघर जिल्हात पेसा अंतर्गत गाव पातळीवर निधी व पेसा कायद्या अंतर्गत १४ संवर्ग पदांची नोकर भरती याविषयी चर्चा करण्यात आली . सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक ६ जुलै २००७ च्या आरक्षणाबाबतच्या  व जात वैधतेच्या शासकीय नोकरदाराच्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी या विषयी चर्चा करण्यात आली. तर भास्कर दळवी यांनी संस्थेचे आजपर्यंत केलेल्या कार्याबाबत माहिती दिली.
             यासभेत ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन पालघर , आदिवासी शिक्षक संघटना पालघर , आदिवासी युवा संघ जव्हार , आदिवासी कोकणा समाज सेवा संस्था पालघर , महादेव कोळी समाज उन्नती मंडळ मोखाडा,  तसेच जव्हार , विक्रमगड व इतर सर्व आदिवासी समाज संघटना चे प्रतिनिधी उपस्थित होते .या सभेच्या आयोजनासाठी मातृभूमी आदिवासी सेवाभावी संस्था वाडा चे अध्यक्ष भास्कर दळवी , सचिव जयराम राऊत , मोहन धूम ,मगन पाटील यांनी  विशेष मेहनत घेतली .

 

comments

About Rajtantra

Scroll To Top