दिनांक 20 January 2019 वेळ 8:29 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » युपीएससी मध्ये पालघर जिल्ह्यातून वाड्याचा एकमेव हेमंत पाटील यशस्वी

युपीएससी मध्ये पालघर जिल्ह्यातून वाड्याचा एकमेव हेमंत पाटील यशस्वी

IMG-20180429-WA0050प्रतिनिधी
            वाडा, दि. २९ :- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी)२०१७  या वर्षाचा निकाल शुक्रवारी जाहिर झाला. वाडा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या मौजे शिलोत्तर या खेडेगावातील हेमंत केशव पाटील हा विद्यार्थी देशात ६९६ क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यात तो एकमेव विद्यार्थी आहे. यापूर्वी सन २०१२ च्या युपीएससी परीक्षेत वाडा तालुक्यातील मौजे पीक येथील चिन्मय पाटील व मौजे कासघर येथील यतिश पाटील यांनी या परीक्षेत यश मिळवले आहे.
            हेमंत पाटील हा विद्यार्थी लहानपणापासून अत्यंत हुशार आहे. त्याचे वडील तलासरी येथील ठक्कर बाप्पा विद्यालयात शिक्षक असून आई गृहिणी  आहे. हेमंत याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत प्रत्येक परीक्षेत त्याने पहिल्या क्रमांकानेच यश मिळविले आहे.
            दहावीच्या परीक्षेत (२००७) तो ८७ टक्के गुण मिळवून तलासरी तालुक्यात प्रथम आला होता. तर बारावीच्या परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवून वाडा तालुक्यात प्रथम आला होता. त्यानंतर लोणेरे (रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युर्न्हसिटीत त्याने केमिकल इंजिनिअर परीक्षेत गोल्ड मेडिलिस्ट मिळविले आहे. येथेही तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
          केमिकल इंजिनिअर झाल्यानंतर हेमंत याला अंकलेश्वर (गुजरात) येथे वरिष्ठ पदावरची नोकरी मिळाली होती.पण नोकरीत त्याचे मन रमले नाही.तो नोकरी सोडून पुणे येथे आला.व युपीएससीचा अभ्यास करून त्याने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. या यशाचे श्रेय त्याने मोठा भाऊ विकास व आई-वडिलांना दिले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top