दिनांक 27 May 2018 वेळ 3:08 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात पुन्हा सापडला बॉम्ब तालुक्यातील सासणे गावातील टेकडीवर सापडला बॉम्ब 

वाड्यात पुन्हा सापडला बॉम्ब तालुक्यातील सासणे गावातील टेकडीवर सापडला बॉम्ब 

IMG_20180427_142716
    वाडा, दि. २७: दोनच दिवसांपूर्वी वाडा तालुक्यातील देवळी गावातील शेतात बॉम्ब सापडल्याची घटना ताजी असतानाच तालुक्याती
ल सासणे या गावातही दुसरा जिवंत बॉम्ब सापडल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे.
            देवळी  गावापासून ४ किलोमीटरवर असणाऱ्या सासणे या गावापासून जवळ असलेल्या प्रफुल्ल गवळी यांची बागायत असलेल्या एका टेकडीवर हा जिवंत बॉम्ब असल्याची माहिती शुक्रवारी ( दिनांक २७ ) गवळी यांनी स्वतः दिल्यानंतर पोलीसांनी व प्रशासनाने लागलीच दखल घेऊन प्रत्यक्ष पहाणी केली व पुढील कार्यवाहीची प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी सांगितले.  तालुक्यातील देवळी येथे शेतात काम करणाऱ्या मजुरांना दोन दिवसांपूर्वी हा बॉम्ब आढळून आला होता. याबाबत बॉम्ब पथकाने हा जिवंत बॉम्ब असल्याची माहिती दिली.
       दरम्यान या परिसरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांच्या छावण्या असल्याचे जेष्ठ ग्रामस्थांचे म्हणणे असून हे बॉम्ब त्याच काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र सध्या शेतात व माळरानावर सापडणाऱ्या या बॉम्बचे गूढ वाढले असून अजूनही बॉम्ब असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या बाबत अधिक चौकशी होण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top