दिनांक 20 January 2019 वेळ 8:11 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर लोकसभा मतदारसंघ निवडनुक : प्रथमच व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर होणार

पालघर लोकसभा मतदारसंघ निवडनुक : प्रथमच व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर होणार

LOGO-4-Onlineवार्ताहर
           बोईसर, दि. २७ : पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार अँड चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २८ मी रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत ईव्हीएम मशीनशी व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर करण्यात येणार असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी विविध समित्यांचे गठन केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
              पालघर लोकसभा पोट निवडणुकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी निवासी उप जिल्हाधिकारी डॉ नवनाथ जरे, निवडणूक उप जिल्हाधिकारी डॉ किरण महाजन, जिल्हा महिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते. निवडणुकीची घोषणा झाल्याने जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली असून या संदर्भात अधिकारी वर्गाची बैठक आयोजित करून या संदर्भात माहिती देण्यात आली. त्याचप्रणाने पोलीस अधिकारी, राजकीय पक्ष यांची बैठक आयोजित करून कोणत्याही पदाधिकारी यांच्याकडून आपल्या पदाचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पेड न्युज आणि प्रसिध्द झालेल्या जाहिरातीचा खर्च पत्रकारांनी जिल्हा महिती कार्यालयाला देऊन सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले. निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग झाल्यास पत्रकारांनी शासनाच्या निदर्शनास आणून दयावे असेही ते पुढे म्हणाले. या निवडणुकीच्या दृष्टीने खर्च नोंदणारे पथक, आचारसंहिता पथक, सोशीएल मीडिया वर देखरेख ठेवणारे पथक, ग्राम सेवा पथक, दक्षता पथक अशा विविध पथकाची निर्मिती करण्यात आली असून लोकशाहीच्या महापर्वामध्ये जातीय, प्रांतीय द्वेष पसरणार नाहीत याची सर्व घटकाने जबाबदारीने वागवून आवश्यक काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
              निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३ मे ते १० मे या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. तसेच ११ मे रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून १४ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर २८ मे रोजी मतदान होणार असून मत मोजणी ३१ मे रोजी पालघर येथे होणार आहे, अशी माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली. निवडणूक काळात पैशाची, तसेच दारूची अवैध पद्धतीने वाहतूक होणार नाही करीत विविध ठिकाणी चेक पोस्ट कार्यरत करणार येणार असून संवेदनशील मतदार क्षेत्रामध्ये निम लष्करी पथकांना पाचारण करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
पालघर लोकसभा क्षेत्रात १७.४६ लाख मतदार असून १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीला या निवडणुकीकरिता ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे ज्या मतदारांकडे छायाचित्रे नसलेले ओळखपत्र असेल त्यांना देखील मतदान करता येणार आहे. या यादीत १.४२ लाख मतदारांची छायाचित्रे असून अश्या मतदारांचे रंगीत फोटो बीएलओमार्फत गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती डॉ, किरण महाजन यांनी दिली

comments

About Rajtantra

Scroll To Top