दिनांक 20 January 2019 वेळ 8:14 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » इस्काॅन संस्थेने विद्यार्थ्यांना दिले विज्ञान व गणिताचे विशेष प्रशिक्षण

इस्काॅन संस्थेने विद्यार्थ्यांना दिले विज्ञान व गणिताचे विशेष प्रशिक्षण

IMG-20180427-WA0008प्रतिनिधी
             कुडूस, दि, २७ : वाडा तालुक्यातील गालतरे येथे गोवर्धन इको व्हिलेज इस्काॅन ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या शिक्षण विभागांतर्गत गणित व विज्ञान विषय सोप्या व अचूक पद्धतीने कमी वेळात समजून कसा घ्यावा व प्रश्नांची उत्तरे कमी वेळात अचूक  कशी लिहावीत या विषयी तज्ञ प्रशिक्षित शिक्षकांकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले. 
             इस्काॅन संस्थेच्या माध्यमातून हैदराबाद येथील वन्दे मातरम शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून गणित व विज्ञान विषयाचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांकडूनदहा दिवसीय शिबिरातून हे मार्गदर्शन करण्यात आले.  वाडा व विक्रमगड तालुक्यातील विद्यार्थी या विशेष प्रशिक्षण शिबीरात सहभागी झाले होते. गणित व विज्ञान या विषयांसोबतच व्यक्तीमत्व विकास, चारित्र्य संवर्धन, योगासन, सूर्यनमस्कार, नेतृत्व गुण विकास, खेळ, हस्तकला, चित्रकला, मुर्ती बनविणे, कार्टून काढणे, ओडीसी नृत्य व  मुंबईतील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रात्री आकाश निरीक्षण या बाबत प्रशिक्षण घेण्यात आले.
            वाडा व विक्रमगड तालुक्यातील ७० विद्यार्थी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. हा उपक्रम वाडा व विक्रमगड तालुक्यांतील शाळांमधून देखील राबविण्यात येईल असे संस्थेतर्फे सांगण्यात आले. दरम्यान प्रक्षिक्षण यशस्वी होण्यासाठी अनिल शेलार, डाॅ.बंकीमराय दास, संस्थेचे सुधीर माधव दास, देवेंद्र जाधव, एकनाथ शिंदे, तानाजी मसाळ, अजय चौधरी,विपुल पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top